खानापूर (प्रतिनिधी) : कोडचवाडात (ता. खानापूर) येथे दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली.
यावेळी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली.
गेल्या आठ दिवसांपासून नवरात्र महोत्सव निमित्ताने सुरू असलेल्या दुर्गामाता दौडला आमाप प्रतिसाद मिळाला होता.
यावेळी कोडचवाडातील युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता
गावात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयघोषणानी दौड काढण्यात येत होती.
गावातील प्रत्येक मंदिर मंदिरात आरती महापूजा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोडचवाड गावात उत्साह संचारला होता. युवकांचा सहभाग होता. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
कोडचवाडात दुर्गामाता दौडच्या सांगतेचे औचित्य साधुन भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते दहावी व बारावीत उत्तम गुण घेतलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे नेते, कार्यकर्ते, गावाचे पंच मंडळी व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta