खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला शुगर्सचा ऊस गाळप समारंभ मंगळवारी दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
यावेळी मोळी पुजन आणि क्रेन कॅरियरची पुजा कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी प पू रामदास महाराज विश्वात्मक गुरूदेव सिध्दाश्रम मठ तोपिनकट्टी, प पू चन्नबसव देवरू रूद्र स्वामीमठ अवरोळी, प पू शंभू लिंग शिवचार्या महास्वामी हिरेमन्नोळी, प पू पिरनाथ महाराज कुंभार्ली, प पू सिंग नाथ महाराज बालेवाडी मठ. प पु भयंकर नाथजी महाराज डोंगरगाव मठ, प पू दिव्य चेतन शिवपुत्र महास्वामी चिक्कमन्नोळी, प पू अडविसिध्देश्वर स्वामी हिडकल, प पू पिरयोगी महाराज किरावळे, प पू चन्नवीर देवरू नंदगड, प पू मृत्यूजंय स्वामी गंदिगवाड याच्या सान्निध्यात होणार आहे.
ऊस गाळप चालना इराणा कडाडी खासदार, राज्यसभा व राज्याध्यक्ष रयत मोर्चा भाजपा यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव हलगेकर चेअरमन लैला शुगर्स प्रा. लिमिटेड खानापूर, संस्थापक श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी, भाजप नेते हे उपस्थित राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta