खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
गेल्या आठ महिन्यानंतर मिळालेले कागवाड तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाह अधिकारी (ईओ) वीरनगौडा पी. यगनगौडर हे कार्यालयात हजर नाहीत. त्यामुळे खानापूर तालुक्याला ईओ असुन नसल्यासारखेच आहे. आपली सुत्र नुतन तालुका पंचायत ईओ वीरनगौडा पी. यगनगौडर स्विकारली आणि महिनाभर आलेच नाहीत. यामागचे नेमके कारण काय असावे असा प्रश्न खानापूर तालुक्यातील जनतेला पडला आहे. यावेळी तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या विकासाचा प्रश्न उभारला आहे.
तेव्हा खानापूर तालुका पंचायतीच्या ईओ वीरनगौडा यगनगौडर यापुढे तरी तालुका पंचायतीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी हजर व्हावे, अशी खानापूर तालुक्यातील जनतेतून मागणी होत आहे
Belgaum Varta Belgaum Varta