
खानापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्यासाठी आज पहाटे 4 च्या सुमारास दोन हजार कार्यकर्ते बेल्लारीकडे बसने रवाना झाले. त्याचबरोबर खाजगी वाहनाने देखील काँग्रेस कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत.
मा. आमदार अंजलीताई संपूर्ण कर्नाटकात राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी आहेत. त्यात आज खानापुरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले आणि खानापूरकरांनी आपल्या बुलंद आवाजाने असमंत दणाणून सोडले.
साधारण दुपारी 1 च्या सुमारास सर्व बसेस 350 कि. मी.चे अंतर कापून कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेवर पोचल्या. पदयात्रेच्या मार्गावर पोचल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी जेवण केले व त्यानंतर पदयात्रेमध्ये सहभागी झाले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत राज्यभरातून लाखो लोक सहभागी होत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta