खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. पुलावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बेळगाव- कुसमळी चोर्ला मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला खुप मोठा अडथळा निर्माण होत आहे.
याची जाणीव कुसमळी गावच्या भाजप युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी पवन गायकवाड, अनंत सावंत पंचायत राज्य प्रकोष्ट, सह संचालक मनोज कारलेकर, विशाल पाटील, विनू कालेहोलकर, हणमंत देसाई, भैरव कालेलकर, रविराज पाटील, विलास गायकवाड, राजू शेट्टी, विजय दळवी, श्रीधर पाटील, शिरीष, किरण देसाई, तसेच पोलिस खात्याचे श्री. बडगेर, काॅन्स्टेबल श्री. सनदी आदी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वांच्या श्रमदानाने मलप्रभा नदीवरील पूलावरी खड्डे बुजवुन रस्ता वाहतूकीस योग्य केला. मात्र याकडे खानापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी तसेच संबंधित पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta