खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बाचोळी नजीक असलेल्या जंगलातील आदिवासी लोकाना गेल्या ६० वर्षापासून भारताचे नागरिक म्हणून जीवन जगताना त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, की जीवन उपयुक्त लागणाऱ्या पाणी, उदरनिर्वाहसाठी लागणारी सामग्री, वीजपुरवठा, रस्ता, शिक्षण अशाप्रकारची कोणतीच सोय नाही.
अशा नागरिकांना खास दीपावलीच्या सनाचे औचित्य साधुन ज्ञानेश्वर माऊली ग्रुपचे अध्यक्ष दिनेश पाटील व त्यांचे सहकारी सदानंद मासेकर, भारत तिरवीर, मनोज मादार, गिरीश पाटील, सोमनाथ गुरव, नागेश हनबर, तुकाराम पाटील, महाराज मादार, विष्णु यल्लूरकर, प्रसाद राऊत, सागर पाटील, संजू मादार आदीनी आदिवासी लोकांसाठी स्वीट, कपडे, साड्या, व इतर साहित्याचे वाटप करून दीपावलीचा सन साजरा केला.
देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे ओलांडून गेली. मात्र खानापूर तालुक्यातील आदिवासी लोकाना कोणत्याही प्रकारची सोय नाही.
राजकीय लोक आपला देश सुजलाम सुफलाम झाला आहे. असे सांगतात. मात्र खानापूर तालुक्यातील आदिवासी लोकांना कोणत्याही प्रकारची सोय का नाही? असा सवाल विचारला जात आहे. तेव्हा राजकीय नेत्यांनी या आदिवासी लोकाना सरकारच्या योजनाचा लाभ मिळवून देण्यास सहकार्य करावे. अशी मागणी आदिवासी लोकांतूनन होताना दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta