खानापूर : मौजे मांडीगुंजी येथे खास दीपावली निमित्त 27 ऑक्टोबर रोजी बाल शिवाजी युवक मंडळातर्फे,
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “प्रश्नमंजुषा” स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये एक गटात चार विध्यार्थी अशा प्रमाणे, एकूण 10 गटांनी भाग घेतला होता. प्रश्न मंजुषा या कार्यक्रमात AP या गटाने प्रथम क्रमांकाची बाजी मारली. द्वितीय क्रमांक GJ या गटाला मिळाला तर तिसरा क्रमांक GA या गटाने मिळविला आणी KL या गटाला चौथ्या क्रमांकावर समाधान मनावे लागले.
AP या गटातून विशाल पू. बिर्जे, नागराज क. बिर्जे, हुवप्पा प. हाणबर, प्रदीप गोंडे या विध्यार्थ्यांनी आपलं कौशल दाखवत प्रथम क्रमांक मिळविला. GJ या गटातून वैष्णवी ध. जळगेकर, पूजा श. घाडी, अदित्य वी. गवस, भाग्यश्री भ. बिर्जे, ह्या विध्यार्थ्यांनी सुद्धा आपलं कौशल दाखवून द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच GA या गटातून विद्या जो. बिर्जे, विना जो. बिर्जे, क्रांती रा. बिर्जे, कपिंजला रा. बिर्जे हे विध्यार्थी सुद्धा अचूक उत्तरे देण्यास कुठे कमी राहिले नाहीत. व KL या गटातून वेदा प्र. गुरव, साक्षी सं. घाडी, समीक्षा प. मळीक, आशा सु. गुरव यांनी चौथा क्रमांक मिळविला.
या कार्यक्रमासाठी रमेश व्य. घाडी यांनी मुख्य जज म्हणून काम पाहिलं तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जोतिबा द. बिर्जे, शुभांगी सं. घाडी, लक्ष्मी र. घाडी व राजू रा. बरगुकर हे होते. तर नेताजी रा. घाडी व हेमंत सा. घाडी यांनी या कार्यक्रमाच सूत्रसंचलन केले. तसेच संदीप घाडी, नारायण मा. बिर्जे व समीक्षा वी. गवस यांचे सुद्धा सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta