खानापूर (प्रतिनिधी) : ऐन गणेशोत्सवाच्या काळात निट्टूर (ता. खानापूर) येथील शेतकरी व विट व्यावसायिक विठ्ठल चंद्रकांत कुदळे (वय ४०) याने पीकेपीएस सोसायटी, नरेवा को-ऑप. सोसायटी, तसेच वैयक्तिक, हात उसने अशा प्रकारे जवळपास १० लाख रूपये कर्ज काढले होते.
सध्याच्या कोरोना काळात व्यवसायही थंडावला आहे. शेतीचे उत्पन्नही कमी झाले.
या विचारात सतत मनस्ताप करून घेत बुधवारी दि. ८ रोजी शेतात पिकावर मारणारे विषारी किटकनाशक पिऊन आत्महत्या केली.
त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गुरूवारी मृतदेहाची उत्तरतपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
गणेशोत्सवाची धामधूम असताना कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने निट्टूर गावात शोककळा पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta