खानापूर : खानापूरात अनैतिक संबंधातून खून झाल्याने खानापूर शहर हादरले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापूर येथील आश्रय कॉलनीत रात्री 12 च्या सुमारास मारुती गणराज जाधव (वय 42) याचा प्रशांत दत्ता नार्वेकर याने धारदार चाकूने वार करून खून केला आहे. मारुती हा रात्री जेवण करून आपल्या घरासमोर शतपावली करत असताना प्रशांत याने अचानक मारुतीवर चाकू हल्ला केला. पोटात चाकूने वार केल्यानंतर पुन्हा मानेवर सपासप वार करून मयत मारुती याला ठार मारले. त्यानंतर प्रशांत हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाशेजारी बसून होता. खानापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तलवार, कुऱ्हाडसह आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस पुढील तपास करीत आहेत. डीवायएसपी कटगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta