खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या जॅकवेल जवळ बाजूच्या बेटात अडकलेल्या बेवारस मृतदेहावर खानापूर कदंबा फाऊंडेशन संस्थेच्यावतीने अंत्यसंस्कार नुकताच करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खानापूर शहारा जवळून मलप्रभा नदी वाहते. या मलप्रभा नदीच्या पात्राजवळ असलेल्या शहराच्या जॅक वेल जवळ असलेल्या बांबूच्या बेटात एक बेवारस मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेश शिंगेसह पोलिस हजर झाले. मृतदेह नदीपात्रातील पाण्यात असल्याने कुजलेल्या अवस्थेत होता. अंगात बदामी रंगाचा शर्ट व खाकी पॅट होती. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ दरम्यान असावे. मात्र मृतदेह इतका सडला होता की तेथून बाहेर घेऊन शलचिकित्सा करणे कठीण होते. सरकारी डाॅक्टराना बोलावून रिपोर्ट सादर केले.
यावेळी बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे पोलिस खात्याला कठीण आहे. अशावेळी खानापूर कदंबा फाऊंडेशनचे अध्यक्ष जॉर्डन गोन्सालवीस यांना बोलविण्यात आले. लागलीच कदंबा फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांनी बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
यावेळी कदंबा फाऊंडेशन अध्यक्ष जॉर्डन गोन्सालवीस, एम. जी. कुमार, मायकेल आंद्रादे, किशोर कलाल, नारायण चौगुले यांचा सहभाग होता. यांच्याकडून आतापर्यंत १६० बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
यावेळी पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे, काॅन्स्टेबल पांडुरंग तिरमुरी, जयराम सातपणावर आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी बेवारस मृतदेहाबद्दल माहिती असल्यास खानापूर पोलिस स्टेशनशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta