Tuesday , March 3 2026
Breaking News

एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्हाप्रमुख घोषित; सुजित चव्हाण आणि इचलकरंजीचे रवींद्र माने यांची नियुक्ती

Spread the love

कोल्हापूर : एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापूर जिल्हाप्रमुखांची घोषणा खासदार धैर्यशील माने आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांचे चिरंजीव सुजित चव्हाण आणि इचलकरंजीचे माजी नगरसेवक रवींद्र माने यांना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखपदी नेमण्यात आले आहे.
सुजित चव्हाण यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, आणि करवीर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. रवींद्र माने यांच्याकडे हातकलंगले, शाहूवाडी, शिरोळ, पन्हाळा, इचलकरंजी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीची पत्रे धैर्यशील माने आणि राजेश क्षीरसागर यांनी दिली.
सुजित चव्हाण यापूर्वी शिवसेना शहर उपप्रमुख पदावर होते. त्याचबरोबर शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष आहेत. रवींद्र माने यांनी इचरकरंजी नगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *