Friday , November 6 2026
Breaking News

भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना वगळले

Spread the love

केंद्रीय निवडणूक समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांना केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि सरबानंद सोनोवाल यांनी संसदीय मंडळात स्थान देण्यात आले आहे.
भाजपाच्या संसदीय मंडळाची यादी
भाजपाच्या संसदीय मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, आणि बी. एल. संतोष या नेत्यांचा समावेश आहे. भाजपाने केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यांची यादी देखील जाहीर केली आहे.
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची यादी
या समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. लक्ष्मण यांचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

नूडल्स खाल्ल्याने पाच जणांचा मृत्यू? प्रकरणाला नवे वळण; मृत्यूपूर्वीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचा खुलासा

Spread the love    ग्रेटर नोएडा : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *