कोल्हापूर शहराचा ’हेरिटेज सिटी’ म्हणून विकास साधण्यावर भर
कोल्हापूर (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा जपणार्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देऊन जयपूर सिटीच्या धर्तीवर कोल्हापूर शहराचा ’हेरिटेज सिटी’ म्हणून विकास साधण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाबाबत पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील खासदार, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबीटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी पालकमंत्री तथा आमदार सतेज पाटील, आमदार सर्वश्री जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, राजूबाबा आवळे, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta