Monday , December 8 2025
Breaking News

ठाकरे- शिंदे वादाची ठिणगी गोकुळ दूध संघात; मुरलीधर जाधव यांचे संचालकपद रद्द

Spread the love

 

कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना याचा फटका बसत आहे. महाविकास आघाडी काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीला कात्री लावत शिंदे सरकारने शिवसेनेसह दोन्ही धक्का दिला होता. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा दूध संघात गोकुळमध्ये शिवसेनेच्या मुरलीधर जाधव यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात गोकुळला आदेश प्राप्त झाल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले आहे.

गोकूळच्या शासकीय प्रतिनिधी पदावरून काढून टाकल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका केलीय. माने आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर काढलेले मोर्चे जाधव यांना भोवल्याच दिसतंय. त्यामुळे जाधव यांनी या दोघांवर आरोप करत शिवसैनिक खासदार माने यांना माजी खासदार करतील असे म्हणत आपला रोष व्यक्त केलाय. तर शिवसैनिक हे पद गोकूळच्या संचालकापेक्षा मोठे असल्याचे म्हणत राज्य सरकारवरही निशाणा साधलाय.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *