Tuesday , March 3 2026
Breaking News

पंढरपूरच्या पैलवानाचा कोल्हापुरात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Spread the love

 

कोल्हापूर : कुस्तीचा सराव करताना 23 वर्षीय पैलवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील तालमीत हा काल (3 ऑक्टोबर) प्रकार घडला. मारुती सुरवसे असं या पैलवानाचं नाव आहे. मारुची मूळचा पंढरपूर जिल्ह्यातील वाखरीमधील आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आंघोळ करत असताना छातीत दुखू लागलं
गेल्या काही वर्षांपासून मारुती सुरवसे हा कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत आहे. रात्री तालमीत कुस्तीचा सराव करुन आंघोळ करत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत मारुतीचे वडील वाखरीत शेती करतात. मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी त्याला कोल्हापूर येथील तालमीत सरावासाठी पाठवण्यात आले होते.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *