बेळगाव येथे उद्या शनिवारी माजी मुख्यमंत्री विरप्पा मोईली यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण
कोल्हापूर (आनिल पाटील) : राधानगरी तालूक्याच्या तहसिलदार मीना निंबाळकर यांना प्रशासकीय सेवेत
उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर” गौरव पूरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दलचे पत्र त्यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थेतर्फे देण्यात आले आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव (कर्नाटक) येथील अशोक नगरमधील धर्मनाथ भवनमध्ये उद्या शनिवार दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
….असे आहे पुरस्काराचे स्वरूप
हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य” सरकारी नोकर व बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, अभिनंदन पत्र, सन्मानपत्र, म्हैसूर फेटा व चंदनाचा हार असे आहे.
Belgaum Varta Belgaum Varta