सीमाप्रश्न पंतप्रधानांनी सोडविण्याची मागणी!
कोल्हापूर : भाषावार प्रांत रचनेनंतर गेली ६० वर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्राच्या – कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून सीमा भागातील गावांचा समावेश महाराष्ट्रमध्ये करावा, यासाठी सकल मराठा परिवार कोल्हापूर मार्फत निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात. गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा महाराष्ट्र – कर्नाटक प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये 2004 पासून प्रलंबित आहे राजकीय इच्छाशक्ती असल्यास हा प्रश्न सहज सुटू शकतो. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
सदर निवेदनावर टीम मधून विकास जाधव, संताजी पाटील, विनायक देसाई, धनील मंडलिक, विनायक मेथे-पाटील, निलेश खराडे, राजू नलवडे, विशाल शेंडगे, रूपाली कदम, मयूर पाटील, अश्विनी साळुंखे इत्यादींच्या सह्या आहेत.