२७ डिसेंबरला संमेलनाचे आयोजन : विविध मान्यवरांची व्याख्याने
कोल्हापूर (वार्ता): पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे १७ वे प्रदेश संमेलन मंगळवारी (ता.२७) कोल्हापुर येथे होत आहे. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यतीचे पत्रकार जतीन देसाई यांच्या हस्ते प्रदेश संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सचिन परब उपस्थित राहणार आहेत.
संमेलनामध्ये माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. संभाजी खरात यांचे उपस्थित पत्रकार मित्रांकरिता बदलती पत्रकारिता आणि आव्हाने यासह अन्य विषयावर प्रमुख मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे.
कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन या ठिकाणी हे प्रदेश संमेलन होणार आहे.
पहिल्या सत्रात सकाळी ११ ते दुपारी १२ वा. माझी पत्रकारिता चर्चासत्र मध्ये जतिन देसाई मार्गदर्शन करणार आहेत. दुसरे सत्र दुपारी १२ ते दुपारी २ वा. आजची पत्रकारिता या विषयावर गणेश कोळी, अतुल होनकळसे, निलेश पोटे, निसार सय्यद व अध्यक्ष सचिन परब यांचे मार्गदर्शन होणार आहे.
तिसरे सत्रदुपारी ३ ते ४ वा. ग्रामीण व शहरी पत्रकारिता आदर्श कशी असावी? यावर संभाजी खराट, उपसंचालक, माहिती व जनसंपर्क यांचे मार्गदर्शन होणार आहे .
चौथे सत्र संध्या. ५ वा. संमेलनाचे ठराव, गौरव समारंभ होणार आहे .
यावेळी पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, प्रदेश अध्यक्ष कांचन जांबोटी, प्रदेश कार्याध्यक्ष निलेश पोटे, अकोला जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गणोरकर, अकोला जिल्हा कार्याध्यक्ष किरण सेदाणी, जिल्हा कार्यवाह राजकुमार चिंचोळकर, जिल्हा सचिव सुधाकर राऊत, जिल्हा सरचिटणीस शुभम टाले, सुनिलकुमार घुरडे व कोल्हापुर जिल्हाध्यक्ष अमजद नदाफ यांनी केले आहे.