

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ इथला हा प्रकार आहे. अचानक घडलेल्या प्रकाराने खळबळ कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. अशातच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याचबरोबर अनेक गायींना विषबाधा झाल्याचे समजते आहे. यातील अद्यापही 30 गायींवर उपचार सुरू आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta