खा. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
कागल (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय कृषी मंत्री व विद्यमान राज्यसभा खा. शरद पवार व कोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन यांच्या हस्ते श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास सन २०२२- २३ चा देश पातळीवरील को-जनरेशन असोशिएशन ऑफ इंडिया या नामांकीत संस्थेचा बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्टसाठीचा देश पातळीवरील पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी पुणे येथील शानदार सोहळ्यात प्रदान केला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासह शाहूचे संचालक यशवंत उर्फ बाॕबी माने, सचिन मगदूम, सुनिल मगदूम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्काराची निवड को-ऑप. सेक्टरमध्ये 87 किलो पर सेंटीमीटर स्क्वेअर बाॕयलर प्रेशरपेक्षा कमी बॉयलर प्रेशर या विभागात झाली आहे.
सन 2021-22 साली वरील संस्थेने “शाहू” कारखान्यास बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट पुरस्काराने सन्मानित केले होते. कारखान्यास मिळालेला हा ६८वा पुरस्कार आहे. यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील २५ तर राज्य पातळीवरील ४३ पुरस्कारांचा समावेश आहे.