Monday , December 23 2024
Breaking News

शाहू कृषी सोसायटीचे 15 कोटीपर्यंत व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट : समरजीतसिंह घाटगे

Spread the love

 

41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कागल (प्रतिनिधी) : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून आज शाहू कृषी सह. खरेदी विक्री सोसायटीची वाटचाल कौतुकास्पद आहे. येत्या काळात सोसायटीच्या शाखा वाढविणार असून चालू आर्थिक वर्षात शाहू कृषी सोसायटीचे 15 कोटीपर्यंत व्यवसाय वाढीचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले.
येथील शाहू कृषी सह. खरेदी-विक्री सोसायटीच्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष अनंत फर्नांडिस होते.
यावेळी शाहू कृषी सोसायटीच्या वतीने शाहू साखर कारखान्यास सलग दुसऱ्यांदा अत्यंत सन्मानाचा “को-जन पाॅवर प्लांट ” पुरस्कार मिळाल्याबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.
घाटगे पुढे म्हणाले, कागल मतदारसंघात सहकारातील अनेक छोट्या-मोठ्या संस्था बंद पडत आहेत. आज बाहेर अत्यंत वाजवी दरात राजरोसपणे खतांची विक्री केली जाते. मात्र आपल्या शाहू सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून किफायतशीर दरात खतांची विक्री केली जाते. येत्या काळात “शाहू पोटॅश” निर्मितीवर भर देणार असल्याचे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष अनंत फर्नांडिस यांनी मागील वर्षामध्ये 10 कोटी 27 लाख रुपये इतकी खत विक्री झाली असून 1 लाख 53 हजार रुपये इतका नफा संस्थेस झाला असल्याचे सांगितले. यावेळी विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक समीर नाळे यांनी केले.उपस्थित सर्वच सभासदांनी विषयपत्रिकेवरील सर्वच विषय एकमताने मंजुर करण्यात आले.
यावेळी शाहू कृषी संघाचे संचालक भाऊसो कांबळे, बाळकृष्ण काईंगडे, जयश्री कोरवी, मोहन शेटके, रामचंद्र वैराट, दिनकर वाडकर, प्रशांत घोरपडे, आनंदा पाटील, यांच्यासह शाहू ग्रुपचे पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक शाहू कृषी सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण शिंत्रे यांनी केले. आभार संचालक पंकज पाटील यांनी मानले.
——————————————————————

एकाच छताखाली शाखा सुरू करणार

सार्वजनिक संस्थांमध्ये वारेमाप खर्च हानीकारक ठरतो असा नेहमीच कटाक्ष स्व. राजेसाहेबांचा असायचा. शाहू ग्रुपच्या अनेक संस्थाचा कारभार पारदर्शकपणे चालू आहे. त्यामुळे येत्या काळात संस्थांची भाडेपट्टी, विजबिल, तांत्रिक खर्च आणि वाहतूक याचा विचार करून शाहू ग्रुपच्या सर्वच संस्थांच्या विभागनिहाय शाखा एकाच छताखाली आणण्याचा मनोदय घाटगे यांनी बोलून दाखवला. यामुळे लोकांनाही एकाच ठिकाणी सर्व संस्थांच्या सुविधा मिळणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

Spread the love  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *