नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
कागल (वार्ता) : कागल शहरामध्ये महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून “स्वच्छता पंधरवडा -स्वच्छता ही सेवा २०२३” अंतर्गत दि. ०१ ऑक्टोबर, २०२३ रोजी एक तारीख-एक घंटा (एक तारीख-एक तास) हा स्वच्छता उपक्रम मोठ्या प्रमाणावर कागल शहरातील खालील ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. ही स्वच्छता मोहीम १५ दिवस चालणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकार पुढे म्हटले आहे की, बस स्टॅन्ड परिसर, बस स्टॅन्ड जवळील ब्रिज, संत रोहिदास विद्या मंदिर परिसर, विराज सिटी
परिसर, शाहू स्टेडीयम, तू. बा. नाईक शाळा परिसर, हिंदुराव घाटगे विद्या मंदिर परिसर, कोल्हापूर वेस परिसर, जुना घरकुल परिसर, गणेश नगर घरकुल परिसर, मेन रोड, पाझर तलाव, शिवाजी महाराज चौक, वाय. जे. हायस्कूल परिसर, यशवंत किल्ला परिसर, ना. गोपालकृष्ण गोखले विद्या मंदिर माळभाग, गैवी चौक परिसर, जिल्हा रुग्णालय परिसर, वाय. डी. माने पॉलीटेकनिक कॉलेज, शाहू उद्यान परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
नागरिकांनी या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा. नागरिकांनी उपक्रम ठिकाणी उपस्थित राहताना सोबत पाण्याची बॉटल घेऊन यावे. तसेच कागल शहरामध्ये प्लास्टिक बंदीची १००% अंमलबजावणी असल्याने सोबत कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक वस्तू आणू नयेत, असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.