
पर्यावरणपूरक विसर्जनास दिली पसंती
कागल (वार्ता) : कागल नगरपरिषदेच्यावतीने मुख्याधिकारी श्रीराम पवार यांचे मार्गदर्शनखाली दुधगंगा नदी आणि कारखाना खाण येथे गणेश मूर्ती विसर्जन व्यवस्था केली होती. तरीही कागल शहरातील स्थानिक मंडळांनी ११ गणेशमूर्ती कागल नगरपरिषदेकडे मूर्ती दान करून पर्यावरण पूरक विसर्जनास पसंती दिली. तसेच नदीघाट आणि कारखाना खण येथे सायंकाळी ४ पर्यंत ३५० किलो निर्माल्य गोळा करून खत निर्मिती करता घनकचरा प्रकल्प येथे पाठविणेत आले. या प्रसंगी आरोग्य अधिकारी नितीन कांबळे, अग्निशमन अधिकारी बाळासाहेब माळी, पॉल सोनूले, सुरेश शेळके, अमित गायकवाड, प्रकाश पाटील, रोहित माळी, विजय पाटील, बादल कांबळे, आशिष शिंगण तसेच आरोग्य विभाग कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी, ऍम्ब्युलन्स विभाग कार्यालयीन कर्मचारी अधिकारी जवळ जवळ अधिकारी व ५० कर्मचारी नेमून विसर्जन व्यवस्थे करिता यंत्रणा नादीघाट व कारखाना खाण येथे सज्ज ठेवून नेटके नियोजन करणेत आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta