Tuesday , March 3 2026
Breaking News

स्मशानभूमीत भोंदूगिरीचा प्रकार; एका मांत्रिकासह 14 जणांच्या टोळीचा पर्दाफाश

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीत कृष्णा नदी काठच्या स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री ‘ओम भट्ट स्वाहा’ करुन भोंदूगिरी करण्याचा प्रकार हाणून पाडण्यात आला. एका मांत्रिकासह 13 ते 15 जणांच्या टोळीने अघोरी यज्ञ पार पडला. गावातील सतर्क तरुणांनी हा प्रकार पाहिल्यानंतर ही भोंदूगिरी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मांत्रिकासह सहभागी झालेल्या काही जणांना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

तीन तास यज्ञ जाळून ओम भट्ट स्वाहा
कृष्णा नदी काठाला नैसर्गिक खडकाचा घाट आहे. त्याठिकाणी स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत पौर्णिमेच्या रात्री अंगाला अंगारा लावून मांत्रिक वेशातील एका मंत्रिकासह सांगली जिल्यातील तब्बल 13 ते 15 जणांनी एक यज्ञ पेटवला. तीन तास यज्ञ जाळून ओम भट्ट स्वाहा झाल्यानंतर इच्छित विधी झाल्यानंतर ती मंडळी निघाली. हनुमान मंदिराजवळ सांगली पासिंग असलेली दुचाकी तसेच एक रिक्षा लावली होती. तिथे आल्यानंतर गावातील युवकांनी त्यांना हे काय केला? अशी विचारणा केल्यानंतर पूजा केल्याचे सागितले. अधिक चौकशी केली असता भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला. तरुणांनी बॅगा पाहिले असता त्यामधे लिंबू, कुंकू, हळद, दोरा गंडे, नारळ आदी साहित्य सापडले.

कोणाला फसवण्याचा उद्देश तर नाही ना?
भोंदूगिरी कृती असल्याचे लक्षात आल्यानंतर मांत्रिकासह अन्य काहीजणांना कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. काहींनी पलायन केले. मात्र, हा यज्ञ कशासाठी करण्यात आला? यामागे काही कारण आहे का? कोणाला फसवण्याचा उद्देश तर नाही ना? अशीही शंका उपस्थित झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच गणेशवाडीपासून 10 किमी अंतर असलेल्या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये भोंदू बाबाच्या नादी लागून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात मांत्रिकानेच कोट्यवधी रुपयांना फसवून त्यांना विष दिले होते. त्यामुळे हे प्रकरण ताजे असताना सांगलीमधील एका मांत्रिकासह 14 जणांची टोळी गणेशवाडी कृष्णा नदी घाटावर आल्याने व केलेल्या या भोंदूगिरीने भूवया उंचावल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *