Friday , November 22 2024
Breaking News

स्वच्छता ही सेवा २०२३ अंतर्गत कागल शहरात स्वच्छता अभियान

Spread the love

 

मंत्री हसन मुश्रीफ झाले स्वच्छता मोहिमेत सहभागी

कागल (वार्ता) : कागल नगरपरिषदेमार्फत महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून “स्वच्छता पंधरवडा”- स्वच्छता ही सेवा 2023 अंतर्गत 1 ऑक्टोबर 2023 एक तारीख एक तास हा स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या अभियानामध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहभाग घेतला.
सकाळी १० ते ११ दरम्यान कागल शहरामध्ये वीस ठिकाणी या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. या अभियानामध्ये वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, यांच्यासह पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नगरसेवक प्रवीण काळबर, अस्लम मुजावर, इरफान मुजावर, युवराज लोहार, संजय चितारी, अरोग्य अधिकारी नितीन कांबळे, दस्तगिर पाखाली, आशिष शिंगण, बादल कांबळे यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. श्री शाहू हायस्कूल आणि नगरपरिषद शाळांचे चे विद्यार्थी एन.सी.सी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक प्रमुख मान्यवर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी, बचत गटाचे महिला सदस्या, वनमित्र संघटनेचे सदस्य यामध्ये सहभागी झाले. यावेळी स्वच्छतेची शपथ सर्वांना देणेत आली.
बस स्टँड परिसर, बस स्टॅन्ड जवळ ब्रिज, संत रोहिदास विद्यामंदिर परिसर, विराज सिटी, शाहू स्टेडियम, तू. बा. नाईक शाळा,
हिंदुराव घाडगे विद्यामंदिर परिसर, कोल्हापूर वेस, जुना घरकुल परिसर, गणेश नगर घरकुल परिसर, पाझर तलाव, शिवाजी महाराज चौक, वाय. जी. हायस्कूल परिसर, यशवंत किल्ला परिसर, नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर, माळभाग शाळा, गैबी चौक परिसर, जिल्हा पारिषद रुग्णालय परिसर, शाहू उद्यान परिसर या वीस ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *