कागल (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या युगात संगीत हीच मानवाची खरी ऊर्जा आहे. मानवाच्या आयुष्याची उंची वाढवण्याचे काम सुद्धा संगीत करीत असते. आजच्या काळात तीन -चार वर्षाच्या मुलापासून वयोवृद्ध झालेल्या व्यक्तींची टीव्ही वरती गाणी ऐकली की खूप आनंद मिळतो. आज गायन कलेतील गायकांचे विशेष कौतुक, कारण साधने शिवाय कला जपता येत नाही. आपण घेतलेला हा विचार नक्कीच आपणास ध्येयाकडे घेऊन जाईल.नवोदित गायक कलाकारासाठी कागल संगीत अकादमीचे योगदान नक्कीच आदर्शवत आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले.
स्व.लता मंगेशकर जयंती निमित्त व स्व. एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या पुण्यतिथी निमित्त कागल संगीत अकादमी कागल प्रस्तुत सुरसंगीत सुरेली शाम. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कागल सुरसंगीत अकादमीचे अध्यक्ष संजय ठाणेकर, उपाध्यक्ष निहाल जमादार, कार्याध्यक्ष रईस पठाण, माजी उपनगराध्यक्ष सदाशिव पिष्टे, राजे बँकेचे संचालक उमेश सावंत, माजी उपनगराध्यक्ष सुनिल माळी, सेक्रेटरी हिदायत नायकवडी व सदस्य बाळासाहेब पाटील, अस्लम शेख, पंकज नाळे, स्वप्निल कांबळे, शाकीर पठाण उपस्थित होते. यावेळी निहाल जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.
कागल नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीराम पोवार, आरोग्य विभाग अधिकारी नितीन कांबळे. रोहित माळी तसेच प्रशासकीय अधिकारी यांचेही सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले.
या कार्यक्रमात कागल संगीत अकादमीचे सेक्रेटरी हिदायत नायकवडी यांच्या “श्री गणेश वंदन” या गीत गायनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी राजमहंमद शेख, तुषार भास्कर, विजय घाटगे, विठ्ठल भोपळे, विजय धामण्णा पाटील, विलास कांबळे, प्रशांत रेडेकर, अजयकुमार मालगावकर, इरफान खलिफ, राजू कांबळे, उमेश सावंत, फिरोज ताशिलदार, तानाजी सुतार, सुनील कारंडे, संजय पाडदे, विनायक गोंधळी, अजहर ताशिलदार, इम्रान खलिफ, सुनील बोते, मोहन जिरगे, रंजना निंबाळकर, मनीषा गोंधळी यांच्या उत्कृष्ट गीत मैफिलीने कार्यक्रम संपन्न झाला .
या कार्यक्रमाचे स्वागत निहाल जमादार उपाध्यक्ष, तर प्रास्ताविक संजय ठाणेकर अध्यक्ष कागल संगीत अकादमी यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल भोपळे यांनी केले. तर आभार कागल संगीत अकादमीचे कार्याध्यक्ष रईस पठाण यांनी केले.