
कागलमध्ये खास समारंभात होणार पुरस्कार वितरण
कागल (प्रतिनिधी) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन व कागल तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलच्यावतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे वितरण 22 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता मटकरी हॉल डी. एड., बी. एड. कॉलेज, सांगाव रोड- कागल या ठिकाणी होत असून या पुरस्काराचे वितरण वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रम काळे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक असणार आहेत. यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे, आमदार प्रा.जयंत आसगांवकर, (शिक्षक आमदार पुणे विभाग), गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, शिक्षक नेते दादासाहेब लाड, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, प्रविणसिंह पाटील, वसंतराव धुरे, शशिकांत खोत, विकास पाटील, रमेश तोडकर, राजेंद्र माने, काशिनाथ तेली, प्रवीण भोसले, सूर्यकांत पाटील, गणपतराव फराकटे, सतीश पाटील, मनोज फराकटे, प्रकाश गाडेकर, दिनकर कोतेकर, जयदीप पवार, बाळासो तुरंबेकर, गणपतराव कमळकर, बळवंतराव माने उपस्थित राहणार आहेत.
या भव्य कार्यक्रमाला सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन कोजिमाशि संचालक राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी शिक्षक सेल अध्यक्ष शंकर संकपाळ, उपनगराध्यक्ष सुनिल माळी, सुकुमार पाटील, वसंत जाधव, शानाजी माने, उमेश माळी, भीमराव कोगले, नंदकुमार कांबळे, तानाजी सावंत, अरविंद पाटील, जी. एस. पाटील, काकासो पाटील, नंदकुमार घोरपडे, के. व्ही. पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta