
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याता आल्या आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच जागेवरील अमोल येडगे कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी असतील.
वादग्रस्त भूमिकेमुळे राहुल रेखावार चर्चेत
राहुल रेखावार कोल्हापूर जिल्हाधिकारी असताना अनेकवेळा चर्चेत राहिले. अंबाबाई मंदिरात पत्रकारांना प्रवेश रोखणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवांकडून तत्काळ पदभार काढून घेणे आदी मुद्यांवरून चांगलेच चर्चेत राहिले. कोल्हापूर मनपाला प्रशासक मिळत नसताना त्यांनी काही मनपाची सुद्धा जबाबदारी पाहिली होती. भाजपकडूनही त्यांना हटवण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्यावर्षी महापूर येऊन नागरिकांना आपत्तीला तोंड द्यावा लागेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. त्यानंतर अनेकांचे स्थलांतर केले. त्यामुळे भीतीचं वातावरणही निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक वादग्रस्त भूमिकेमुळे राहुल रेखावार चर्चेत राहिले.
Belgaum Varta Belgaum Varta