कोल्हापूर : अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली भागाला महापुराचा पुन्हा मोठा धोका उद्भवू शकतो. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर स्थिती नियंत्रणात ठेवावी. अशी मागणी डि के शिवकुमार यांच्याकडे केली आहे.
यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व नामदार एच. के. पाटील हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि डी. के. शिवकुमार यांनी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुराची परिस्थिती उद्भवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी, अशी सूचना दिली आहे.
याला सकारात्मक प्रतिसाद देत नामदार डी. के. शिवकुमार यांनी अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही परस्पर सहकार्याने काम करत आहोत, असेही ते म्हणाले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta