Tuesday , September 17 2024
Breaking News

गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत

Spread the love

हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालून वर्षातून एकदाच येणार्‍या गणेशोत्सवाला प्रदूषणास जबाबदार ठरवतात. त्यामुळेच गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान करण्यास किंवा कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. तरी गणेशोत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी गणेशमूर्ती विसर्जन हा भाविकांचा धार्मिक अधिकार असल्याने गणेशभक्त आणि  भाविकांना वहात्या पाण्यातच विसर्जन करतील, अशा ठाम भूमिका आयुक्तांकडे मांडली. समितीच्या निवेदनाची नोंद घेऊन आयुक्तांना प्रशासन आवाहन करण्याचे काम करेल, कोणावरही जबरदस्ती करणार नाही, असे सांगितले. याच मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांनी स्वीकारले.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, सकल हिंदू समाजाचे श्री. अभिजित पाटील, हिंदु ऐकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. संदीप शेटके, हिंदु महासभेचे जिल्हाप्रमुख श्री. मनोहर सोरप, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. शिवानंद स्वामी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, मराठा उद्योजक श्री. प्रसन्न शिंदे, श्री. विक्रम जरग उपस्थित होते.

यावेळी करण्यात आलेल्या काही मागण्या..

1. गणेशभक्तांकडून ‘मूर्तीदान’ प्रशासनाने वा अन्य अशासकीय संस्थांनी घेऊ नये, तसेच  प्रतीवर्षी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून कृत्रिम तलाव सिद्ध करण्यात येऊ नयेत.

2. महापालिका प्रशासनाने प्रशासन पंचगंगा नदीवर बॅरिकेटस् लावून मूर्तीविसर्जन करण्यास बंदी न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे, त्यांना ते करू देण्यात यावे.

3.  गणेशमंडळांना, तसेच गणेशभक्तांना पूर्वापार धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रातील मूर्तीविसर्जन करण्यास अनुमती देण्यात यावी.

About Belgaum Varta

Check Also

समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; 3 सप्टेंबर रोजी तुतारी फुंकणार

Spread the love  कोल्हापूर : फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आश्वासक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *