Sunday , December 7 2025
Breaking News

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी जाणार

Spread the love

 

योजनेत निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिनंदन

कोल्हापूर (जिमाका) : राज्यात सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याकरीता कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत तीर्थदर्शनासाठी 2 हजार 146 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 1 हजार 983 अर्ज पात्र झाले असून त्यामधील 800 लाभार्थी लॉटरी पद्धतीने निवडले गेले आहेत. “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” निवड झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे व राज्यात प्रथम क्रमांकाने कोल्हापूर जिल्हा “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” या योजनेचा लाभ घेत असल्याबाबत सर्वांचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या जिल्हा समितीचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना राज्य व देशातील तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राबविण्यात येत आहे. दि. 14 जुलै च्या शासन निर्णयानुसार लाभार्थीची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक तालुका ठिकाणच्या लोकसंख्येनुसार तालुका निहाय कोटा निश्चित करून कोट्यापेक्षा जास्त अर्जाची निवड लॉटरीद्वारे केली आहे. ज्या तालुक्यातील अर्ज कमी आले आहेत. त्या तालुक्यांचा कोटा सर्वाधिक अर्ज येणाऱ्या तालुक्याला देण्यात आला आहे. सामाजिक न्याय भवन, कोल्हापूर या ठिकाणी लकी ड्रॉ करण्यात आला. 800 अर्जांची निवड करुन उर्वरित अर्ज प्रतिक्षाधिन ठेवण्यात आले आहेत.

“मुख्यमंत्री तीथ दर्शन योजना” तालुका निहाय प्राप्त अर्जांचा तपशील

करवीर – 215, हातकणंगले – 171, शिरोळ – 79, कागल – 118, पन्हाळा – 49, भुदरगड – 32, गगनबावडा – 2, शाहुवाडी -3, राधानगरी – 40, आजरा – 3, गडहिंग्लज – 48 व चंदगड 40 असे एकूण 800 लाभार्थी तालुक्यातुन निवडले गेले आहेत.

पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे आयोध्येसाठी होणार मार्गस्थ

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभार्थ्यांना आयोध्येला घेवून जाणारी रेल्वे दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.50 वाजता छत्रपती शाहु महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ होणार आहे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांना इंडीयन रेल्वे कॅटरीन अँड टुरीझम कार्पोरेशन लिमिटेड (भारत सरकार) दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.50 वाजता छत्रपती शाहु महाराज टर्मिनस कोल्हापूर येथुन घेऊन आयोध्या येथे 30 सप्टेंबर 2024 रोजी आयोध्या धाम येथे पोहचेल व आयोध्या दर्शन घेऊन परत 1 ऑक्टोबर 2024 रोजी आयोध्या धाम येथून लाभार्थी ज्येष्ठ नागरीकांना घेऊन निघेल व 3 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती शाहु महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहचेल. यामध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांचा प्रवास, निवास, भोजन इ. खर्च महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *