कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. काल कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळ फासून ड्रायव्हरला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. याचाच निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानका बाहेर कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटक मध्ये जाणारी वाहतूक यावेळी रोखून धरली. तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारला सज्ज इशारा देत कर्नाटकच्या बस वर भगवा ध्वज फडकवला.