Tuesday , March 3 2026
Breaking News

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. विरेंद्र कानडीकर तर सचिवपदी डॉ. राजेश सोनवणे

Spread the love

खजानीसपदी डॉ.अजित कदम यांची निवड

कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
(जी. पी. ए) च्या सन २०२२-२३ या सालासाठी डॉ. विरेंद्र कानडीकर यांची अध्यक्षपदी तर डॉ. राजेश सोनवणे यांची सचिव व डॉ. अजित कदम यांची खजानीसपदी निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची २०२२-२३ ची जनरल वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २७ मार्च २०२२ रोजी उत्साहात कोल्हापूर मेडिकल असोसिएशन बेलबाग येथे उत्साहात पार पडली. यामध्ये या निवडी करण्यात आल्या. नवीन कार्यकारिणीमध्ये डॉ.राजेश सातपुते, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. वर्षा पाटील, डॉ.विनायक शिंदे, डॉ. रमेश जाधव डॉ,राजेश कागले, डॉ. महादेव जोगदंडे, डॉ. पूजा पाटील, डॉ. प्रशांत खुटाळे, डॉ. विलास महाजन डॉ. शिवराज जितकर तज्ञ सल्लागार म्हणून डॉ.शिवपुत्र हिरेमठ (चेअरमन), डॉ.शिवराज देसाई, डॉ. उद्यम व्होरा, अध्यक्षीय सल्लागार डॉ. सचिन मुतालीक, संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद घोटगे, या सर्वांची निवड करण्यात आली आहे. डॉ. विरेंद्र कानडीकर यांनी संस्थेच्या गौरवशाली इतिहासमध्ये सर्वांच्या सहकार्याने दिलेल्या संधीचे सोने करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ध्येय व उद्दिष्ट असल्याचे नमूद केले व उपस्थित सर्व आजीवन सभासदांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *