
कागल : कोल्हापुरातील कागल एसटी आगाराच्या महिला वाहकाचा तिकीट तपासणी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याचा आरोप होत आहे. दिवसापूर्वी कागल इचलकरंजी मार्गावरील एसटीमध्ये कर्तव्यावर असताना हा प्रकार घडल्याचा दावा केला जातो. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने आज कोल्हापुरातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले. महिला वाहकाचा विनयभंग करणाऱ्या एसटी अधिकाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज एसटी कष्टकरी जनसंघाने निदर्शने केली.
एसटी विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन
एसटी कष्टकरी जनसंघाने कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असलेल्या एसटी विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. एसटी कर्मचाऱ्यांनी या गंभीर कृत्याचा काळ्याफिती लावून निषेध केला प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. अधिकाऱ्यांनी मारहाण विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केलाचा देखील आरोप महिला वाहकानी केला. विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळेस एसटी कष्टकरी जनसंघाने दिला.
Belgaum Varta Belgaum Varta