Sunday , July 26 2026
Breaking News

अट्टल दुचाकी चोरास एपीएमसी पोलिसांकडून अटक; 9 दुचाकी जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या के.एल.ई. रुग्णालयाच्या मागील कर्करोग रुग्णालयासह विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल चोरास एपीएमसी पोलिसांनी अटक करून एकूण 9 दुचाकी जप्त केल्या. मूळचा गोकाक येथील आणि सध्या बेळगावच्या वैभवनगर येथील रहिवासी असलेल्या संतोष अंदानी असे त्याचे नाव आहे.

शहर पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिस इन्स्पेक्टर यू.एस. अवटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करून आरोपीला अटक केली आणि अंदाजे 2,65,000/- रुपये किमतीच्या 02 हिरो होंडा स्टँडर्ड मोटरसायकली, 03 होंडा अक्टिव्हा स्कूटर, 01 सीबीझेड एक्सट्रीम, 01 बजाज पल्सर, 01 हिरो पॅशन प्रो आणि 01 बजाज सिटी-100 अशा एकूण 09 दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात ए.पी.एम.सी. पोलिस ठाण्याचे एस.आर. मुथत्ती पीएसआय, एम.ए. पाटील, ए.एस.आय, दीपक सागर, बसवराज नरगुंद, खादरसाब खानम्मनवर आणि पोलिस तांत्रिक विभागातील कर्मचारी रमेश अक्की, महादेव खशीद यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. याबद्दल पोलिस आयुक्त आणि उपपोलिस आयुक्त (गुन्हे आणि वाहतूक) बेळगाव शहर यांनी कौतुक व्यक्त केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *