Tuesday , March 3 2026
Breaking News

‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी अभियान!

Spread the love

 

कोल्हापूर – ‘लव्ह जिहाद’ हे केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतर, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या, मानवी तस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री अन् आतंकवादी कारवायांत सहभाग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’ला असंख्य हिंदु युवती आणि महिला बळी पडल्या आहेत. त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करावा, या मागणीसाठी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या शक्तीपीठ म्हणजे आई अंबाबाई-श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात २९ सप्टेंबरला स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या प्रसंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या युवती-महिला यांनी मोठ्या संख्येने स्वाक्षरी केल्या. याच समवेत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणीही असे अभियान राबवून स्वाक्षरी घेण्यात येत आहेत.

महिलांच्या हातातील लक्षवेधी फलक!
या वेळी युवती आणि महिला यांनी हातात वैशिष्ट्यपूर्ण फलक धरले होते. या फलकांवर ‘हिंदू मुलींना लव्ह जिहाद विषयात जागृत करणारी, मी ही माता दुर्गेचे रूप बनेन! ‘मै हूं दुर्गा’, असा मजकूर लिहिण्यात आला होता.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदू महासेभेचे श्री. विकास जाधव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे तालुका संयोजक श्री. शरद माळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अर्जुन चौगुले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, श्री. घन:शाम पटेल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, कु. प्रतिभा तावरे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *