Wednesday , December 10 2025
Breaking News

कोल्हापूर उत्तरमध्ये मतमोजणीला सुरुवात; चौथ्या फेरीनंतर जयश्री जाधव 7273 आघाडीवर

Spread the love


कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत आहे.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुसर्‍या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा भागातून मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव 2137 मतांनी आघाडीवर होत्या. जयश्री जाधव यांना 4856 तर भाजपाच्या सत्यजित कदम यांना 2719 मते मिळाली. दुसर्‍या फेरीत जयश्री जाधव यांना 5515 तर सत्यजित कदम यांना 2513 मते मिळाली आहेत. तर तिसर्‍या फेरीमध्ये जाधव यांना 4928 तर सत्यजित कदम यांना 2566 मते मिळाली आहेत. तिन्ही फेर्‍यानंतर जयश्री जाधव या 7501 मतांनी आघाडीवर आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *