Friday , November 22 2024
Breaking News

हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवणार नसाल, तर बहिष्कारास्त्राचा वापर करू!

Spread the love

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची चेतावनी

‘अक्षय तृतीया’ हा हिंदु सणांपैकी महत्त्वाचा सण आहे. या दिवशी हिंदु परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते; मात्र या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अ‍ॅन्ड डायमंड’ने अक्षय्य तृतीयेच्या नावाखाली जणू ‘रमजान’चीच जाहिरात करत असल्याप्रमाणे अभिनेत्री करीना कपूर खान हिची कपाळावर कुंकू किंवा टिकली न लावता दागिन्यांची जाहिरात केली. यातून हेतूतः हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचा, हिंदु संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केला. हिंदु सणांच्या वेळीही जर हिंदूंच्या धार्मिक भावनांचा, संस्कृतीचा, परंपरांचा सन्मान ठेवला जात नसेल, तर हिंदूंनीही या उत्पादनांवर बहिष्कार घालायला हवा. याला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने #No_Bindi_No_Business हा हॅशटॅग चालवत ट्वीटरवर अभियान छेडले आणि याला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. दुसर्‍याच दिवशी ‘मलबार गोल्ड’ने बिंदी न लावलेल्या करिना कपूर-खानच्या जागी बिंदी लावलेली तमन्ना भाटिया या अभिनेत्रीची नवीन जाहिरात प्रसारित केली. हा हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचा परिणाम आहे. हिंदूंचा पैसा हवा आहे, पण हिंदु संस्कृती-परंपरा नको, हे चालणार नाही. हिंदुस्थानात व्यापार करायचा असेल, तर हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवायलाच लागेल. हिंदु संस्कृतीचा सन्मान राखला जाणार नसेल, तर हिंदु समाज बहिष्कारास्त्राचा वापर करेल, हे आस्थापनांनी लक्षात ठेवावे, अशी चेतावनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली आहे.

या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने ‘हिंदु सणांच्या वेळी हिंदुविरोधी प्रचार?’ हा ऑनलाईन ‘विशेष संवाद’ आयोजित केला होता. यामध्ये सहभागी इतिहास आणि संस्कृती अभ्यासक अधिवक्ता सतीश देशपांडे म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत डाव्या विचारसरणीच्या लोकांना राजाश्रय मिळाल्यामुळे त्यांनी विविध विद्यापिठे स्थापून हिंदुविरोधी विचारधारा समाजात रूजवली आहे. त्याचाच परिणाम आहे की, आज टिकली वा कुंकू न लावलेले विज्ञापन प्रसारित होत आहे. त्याला अभ्यासपूर्ण विरोध केला पाहिजे. या वेळी कर्नाटकातील पत्रकार श्रीलक्ष्मी राजकुमार म्हणाल्या की, हिंदूंची ओळख पुसून टाकण्यासाठी चालू करण्यात आलेला हा ‘सांस्कृतिक जिहाद’ आहे. आज आखाती देशांमध्ये तेथील महिला पत्रकार या हिजाब घालून बातमीपत्र देतात. मग भारतात आपण कपाळावर कुंकू लावून केले, तर प्रतिगामी कसे काय होऊ शकतो? आपल्या धार्मिक कृतींमागे असलेले विज्ञान हे हिंदूंपर्यंत पोचले पाहिजे. या वेळी ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक म्हणाले की, केवळ ‘मलाबार’वालेच नव्हे, तर यापूर्वीही तनिष्क, फॅब इंडिया, मिंत्रा, जावेद हबीब, मान्यवर ब्रँड आदींनी हिंदुविरोधी आक्षेपार्ह विज्ञापने केली आहेत. एकही विज्ञापन मुसलमान वा अन्य पंथीयांच्या विरोधात नाही; कारण ते धर्मासाठी संघटित आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात विज्ञापन करण्याचे कोणी धाडस करत नाही. हिंदूंनी स्वत:चा धर्म जपण्यासाठी अशा उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह कायदेशीर लढाई लढली पाहिजे. याविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली पाहिजे.

About Belgaum Varta

Check Also

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *