मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत यांनी काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात नकुतेच वक्तव्य केले आहे. आम्ही मा. मोहनजींचा आदर करतो; परंतु ही त्यांची भूमिका आहे. काशी ही मोक्षनगरी आहे, असे हिंदु धर्मशास्त्रांत वर्णिले आहे. हिंदु जीवनदर्शन तिच्याशिवाय अपुरे आहे. ज्ञानवापीमधील अविमुक्तेश्वराला मुक्त केल्याशिवाय हिंदु समाज मुक्त होणार आहे, अशी हिंदु समाजाची धारणा आहे. हीच हिंदु जनजागृती समितीचीही भूमिका आहे. अविमुक्तेश्वर अतिक्रमणापासून मुक्त होण्यातूनच आमच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होईल, असे आम्हाला वाटते. त्यामुळे जोपर्यंत ज्ञानवापी अतिक्रमणमुक्त होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहिल, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की, विविध विषयांवर विविध संघटना किंवा नेते यांची मते वेगळी असू शकतात. विविध मतांचा आदर करणे, हीच तर आपली संस्कृती आहे. त्यामुळे मतभिन्नता आहे म्हणजे वादविवाद आहेत, असे नाही. त्यामुळे याबद्दल 100 कोटी हिंदू समाजाचेच नाही, तर काही संघ स्वयंसेवकांचेही मत भिन्न असू शकते. ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील सर्व वस्तुस्थिती न्यायालयासमोर आहे. ज्याद्वारे ते हिंदू मंदिर आहे, हे सिद्ध होईल, अशी हिंदु समाजाची श्रद्धा आहे. केवळ प्राचीन काळातीलच नाही, तर आजही बामियानची बुद्धमूर्ती असो किंवा तुर्कस्तानचे हागिया सोफिया चर्च असो, मुसलमानांची आक्रमक मानसिकता सर्वत्र दिसून येते. अशा स्थितीत माणुसकीच्या आणि बंधुतेच्या दृष्टीकोनातून मुसलमान त्यांच्याकडे असलेली मंदिराची जागा हिंदूंच्या ताब्यात देणार नाहीत. त्यामुळे हिंदूंना आंदोलनाद्वारे आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे ही लढाई लढावीच लागणार आहे. याची तयारी हिंदु समाजाने आरंभ केलेली आहे.
Check Also
राजस्थान येथील अपघातात हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघे ठार
Spread the love पती, पत्नी, मुलगा, मुलीचा समावेश हुपरी : येथील संभाजी मानेनगरमधील एकाच कुटुंबातील …