Sunday , September 8 2024
Breaking News

मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस कोल्हापुरात आमने-सामने

Spread the love

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. यावेळी कोल्हापूर शहरातील शाहुपूरी भागात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस आमने- सामने आले. याची जोरदार चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यात काही काळ चर्चाही झाली. दोघेही एकत्र आल्याने शाहुपुरी परिसरात मोठी गर्दी झाली होती.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रसार माध्यमांनी चर्चा केली. यावर मुख्यमंत्री यांच्याशी माझे काही वेळ बोलणे झाले. पूर नियंत्रणावर कायमचा पर्याय काढला पाहिजे. यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली तर आम्ही येण्यास तयार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
*_आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने_*
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निरोपानंतर फडणवीस शाहुपुरीत आल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी फोन करुन सांगितल्याने फडणवीस शाहुपुरीत थांबल्याची घटनास्थळावर जोरदार चर्चा सुरू होती.
आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने आल्याने नव्या चर्चांना वाव मिळाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर आणि परिसराला महापुराचा फटका बसत आहे. पूरग्रस्त भागातील पाणी जोपर्यंत दुष्काळी भागाकडे वळवत नाही तोपर्यंत महापुराचा फटका बसणार आहे.
हा प्रश्न तातडीने सोडविला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीस यांनी आज शुक्रवारी चिखली (ता. करवीर) येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी फडणवीस यांनी पर्यायी जमिनींचा प्रश्नही तातडीने सोडविला पाहिजे, अशी मागणीही केली. ते म्हणाले, ‘दर दोन वर्षांनी कोल्हापूर आणि परिसराला महापुराचा फटका बसतो. त्यात उद्ध्वस्थ झालेल्यांना उभा करणे हे सरकारचे काम आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love    सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात फरार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *