कोल्हापूर : अतिप्राचीन स्वस्तिश्री लक्ष्मीसेंन महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर रायबाग होसुर बेळगाव… या मठामध्ये नूतन मठाधिपती प पु विचारपट्ट 105 क्षुल्लक श्री भरतसेन स्वामी यांचा पट्टाभिषेक महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 24 तिर्थंकर विधानपूजा मोठ्या भक्तिभावनेनी सम्पन्न झाली.. या पूजेचे सौधर्म इंद्र इंद्रायणी पदी महावीर अण्णासाहेब पाटील सौ. स्वाती महावीर पाटील हे दाम्पत्य विराजमान झाले होते या विधानाआधी होमवहनाचा विधी झाला या मध्ये यज्ञनायक पदाचा मान गिरीश मोहन कापसे, सौ. दीपाली गिरीश कापसे या दाम्पत्यांना लाभला.
जैन धर्मामध्ये 24 तिर्थंकर मालिका आहे प्रथम तिर्थंकर भ. आदिनाथ यांच्यापासून 24 वे तिर्थंकर भ. महावीर यांची भक्तिभावाने आराधना केली जाते. यामध्ये दीप धूप फल आदी पुजासामुग्रीने तिर्थंकरांना प्रत्येक तिर्थंकरांना 5 कल्याणीकासाठी 120 बीजांअक्षरें घेऊन मंत्रोपचारातून अर्घि दिली जाते… यामागे संपूर्ण विश्वाची शांती व्हावी हाच उद्देश असतो… समाधिस्थ डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी यांचा उत्तराधिकारी पदी ज्या क्षुल्लक स्वामींचा नूतन पट्टाभिषेक विधीवत होणार आहे त्या स्वामींना 24 तिर्थंकर यांचा आशीर्वाद लाभावा हाही हे पुजाविधान करण्यामागील उद्देश असतो… 24 भगवंतांची आराधनेत आज 300 श्रावक आणि श्रविकांचा सहभाग होता..
आजच्या 24 तिर्थंकर विधान धार्मिक पूजेसाठी पावन सानिध्य नांदनी पिठाचे भट्टारक प पु स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी आणि प पु विचारपट्ट 105 क्षुल्लक श्री भरतसेन यांचे लाभले.
या विधानासाठी पंडित वृषभसेंन उपाध्ये मिरज यांच्यासह संनमती उपाध्ये, प्रशांत उपाध्ये, सुशांत उपाध्ये, पद्माकर उपाध्ये, जयकुमार उपाध्ये, राजू उपाध्ये, निशांत उपाध्ये, ब्रह्मकिरण उपाध्ये, शशिकांत उपाध्ये आदी पंडित गणांचे सहकार्य लाभले..
याच पूजाविधी कार्यक्रमात भक्तांबर एक आध्यत्मिक उपचार स्वप्नील आणि विद्याश्री अथने रचित पुस्तकाचे विमोचन प पु विचारपट्ट क्षुल्लक 105 श्री भरतसेन आणि नांदनी मठाचे प पु स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी यांच्या अमृतहस्ते सम्पन्न झाले… या प्रसंगी धनंजय मगदूम, जे. बी. पाटील, पद्माकर कापसे, सौ. सरिता अथने, धनपाल कटके उपस्थित होते.
रात्री 7 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम जैन मठ शामियान्यात झाले यामध्ये बेळगावच्या महिलांनी सहभाग घेतला होता.. इंदर्भदि गौतम गणधर नाटिका श्रुतिका ग्रुप कोमल ग्रुप यांची पंचांनूव्रत लघु नाटिका कु श्रेणीका दोडनावर, नृत्य मन्या आणि रक्षिता श्रावणी ग्रुप आदी महिलांचा सहभाग होता..
आजच्या पूजेसाठी नेमिनाथ कापसे, बी जे पाटील, श्रेणीक चौगुले, सतिश पत्रावळे, अजित सांगावे, बी आर पाटील, अजित आदींनी परिश्रम घेतले.