मुंबई : राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 12 मुद्यांवर आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली. पण, राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्तीचा मुद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कानी घातला.
गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आपल्याकडे राखून ठेवली असून त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या भेटीचे निमित्त साधून अजित पवार यांनी हा मुद्या सुद्धा पंतप्रधान मोदींच्या समोर मांडला.
गेल्या आठ महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारने याबद्दल यादी राज्यपालांना पाठवली आहे. राज्यात सरकार हे बहुमतात आहे. तरीही याबद्दल निर्णय घेण्यात आला नाही. हायकोर्टात सुद्धा याबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारकडून यादी राज्यपालांना दिली आहे, या आमदारांची नियुक्ती कशी करायची ही कायदेशीर बाब यात पूर्ण आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
पंतप्रधानांसोबत जवळपास दीड तास चर्चा झाली. स्थानिक स्वराज संस्थेच्या ओबीसी आरक्षण काढून टाकले आहे. त्यामुळे 56 हजार जागेवर परिणाम होत आहे. ओबीसीची जनगणना करावी. 50 टक्के ही मर्यादा काढून टाकावी, अशी मागणीही पवारांनी केली.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …