माणगांव (नरेश पाटील) : माणगांव विकास आघाडीतील वॉर्ड क्र.17 चे विजयी उमेदवार दिनेश बाळकृष्ण रातवडकर यांनी दै. वार्ताला दिलेल्या मुलाखतीबाबत बोलताना म्हणाले की, मी 427 मते घेऊन नगरपंचायच्या निवडणुकीत विजय संपादन केला. मात्र या श्रेयात मुस्लिम समाजाचा फार मोठा वाटा असल्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो.
पुढे बोलताना रातवडकर यांनी सांगितले की, लोकांचा आग्रह व त्यांची साथ आणि पाठिंबा राहिल्याने मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो. या प्रभाागाध्ये पिण्याच्या पाणीची समस्या भरपूर आहे. अपुरा पाण्याचा पुरवठा होत असतो. घराघरात पाणी पोचत नाही, मुबलक पाणी मिळविण्यासाठी मोटर लावावी लागते, त्याचा खर्च पडतो, पाणी कमी स्वरूपात मिळते म्हणून पाणीपट्टी कमी घेत नाहीत. फिल्टरेशन प्लँन्टमधून पाणी पुरवठा होत असल्याने ठरलेली रक्कम घेतली जाते. तर या भागाची पिण्याच्या पाण्याची समस्या ही मोठी समस्या आहे.
दुसरी समस्या म्हणजे महिला ह्या कपडे धुण्यासाठी पाणलोटवर जातात. त्याठिकाणी ते सुस्थितीत नाही. ते आम्हाला व्यवस्थित करायचे आहे. आदिवासी वस्ती भागात खास महिलांकरिता व पुरुषांसाठी शौचालय बांधून देणार. त्याच बरोबर इतर समस्यांही सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दिनेश रातवडकर यांनी निदर्शनास आणून दिले की, या प्रभागात सर्वभाषिक लोक राहत असले तरी मुस्लिम समाजाचे 60% हून अधिक लोक आहेत. त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच मी निवडून आलो. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप आभारी आहे. या दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …