मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही.
म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उशिरा पर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचारी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांच्यासह कुटुंबातील अन्य कोणीही मोबाईल उचलला नाही. ग्रामस्थांना शंका आल्यानंतर ग्रामस्थाने घरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी डॉक्टरांच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू तर त्यांच्या भावाच्या घरातील तिघांचा मृत्यू अशा एकूण नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सर्वांचा मृत्यू हा विषबाधेतून झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येत आहे.
मृतांची नावे – माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा)
Belgaum Varta Belgaum Varta