मुंबई : अत्यंत चुरशीने रंगलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला कात्रजचा घाट दाखवला आहे. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीमध्ये विजयी झाले. तर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मतं फुटली असून त्यांना पहिल्या पसंतीची केवळ 41 मतं मिळाली आहे.
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यानंतर एकूण आठ उमेदवारांचा विजय झाला. त्यानंतर नवव्या आणि दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरस निर्माण झाली. शेवटी प्रसाद लाड यांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. त्याचसोबत पहिल्या फेरीत मागे असणारे काँग्रेसचे भाई जगताप यांनी विजयी पताका फडकावली.
पहिल्या फेरीमध्ये रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतासाठी 25.73 चा कोटा ठरवण्यात आला होता. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.
विधानपरिषदेतील विजयी उमेदवार
रामराजे निंबाळकर- 28
एकनाथ खडसे- 29
आमश्या पाडवी- 26
सचिन अहिर- 26
प्रवीण दरेकर- 29
राम शिंदे-30
श्रीकांत भारतीय- 30
उमा खापरे- 27
प्रसाद लाड- 28
भाई जगताप- 26
Belgaum Varta Belgaum Varta