Wednesday , March 4 2026
Breaking News

आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल; शिंदेसेनेत सामील?

Spread the love

मुंबई : शिवसेनेला आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव आता नॉट रिचेबल झाले आहेत. भास्कर जाधव यांचा फोन लागत नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण झाले आहे. भास्कर जाधव सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. यातत आता भास्कर जाधव यांचा फोन लागत नाही. ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे भास्कर जाधव सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *