Saturday , October 19 2024
Breaking News

कुर्ला इमारत अपघातात 11 जणांचा मृत्यू; बचाव, मदतकार्य अजूनही सुरूच

Spread the love

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील काल रात्रीच्या सुमारास इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकाडा 11 वर गेला आहे. या ठिकाणी अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरू असून अजूनही अनेकजण या ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात ही चार मजली धोकादायक इमारत होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते. असे असतानाही त्यात 8 ते 10 कुटुंबे राहत होती, सर्व भाडेकरू आहेत.
एकनाथ शिंदेंकडून पाच लाखांची मदत जाहीर
मुंबईतल्या कुर्ला भागात इमारत कोसळून झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्याचे नगरविकास मंत्री आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी या दुर्घटनाग्रस्तांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांनी ही मदत जाहीर केली असून, जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

“प्रेयसी एक आठवण” या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित निघणार चित्रपट..

Spread the love  ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *