Monday , September 21 2026
Breaking News

सौंदत्ती यल्लमा देवस्थानमधील भ्रष्टाचार रोखा

Spread the love

बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर पुजार्‍यांनी आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. दर्शनाकरिता ते 100 ते 200 रुपये आकारत आहेत तसेच देवीचे थेट दर्शन घेण्याकरिता 500 रुपये आकारात आहेत. येथील देवीच्या दरबारात खुलेआम भाविकांची लुबाडवूक होत आहे. त्यामुळे आज येथील जय भीम ओम साई संघटनेच्या वतीनेयल्लमा देवीचा डोंगरावरती सुरू असलेल्या प्रकाराबाबत निदर्शने करत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
यल्लमा डोंगरात शौचालय पिण्यासाठी तसेच राहण्यासाठी देखील पैसे द्यावे लागतात मात्र त्याच्या तुलनेत डोंगरावर कोणत्याही प्रकाराची स्वच्छता असलेली दिसून येत नाहीत. तसेच आता दर्शनाकरिता देखील पैसे आकारले जात असल्याने आणि त्या बरोबरच कुंडातील पाणी आणण्याकरिता देखील 30 रुपये आकारले जात असल्याने भाविक आतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मोफत दर्शनाच्या रांगेमध्ये दुसर्‍या नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना दर्शन दिले जाते. त्यामुळे रांगेत उभारलेल्या नागरिकांना त्या ठिकाणी तासन्तास थांबावे लागत आहे. तसेच जर कोणी पैसे न दिल्यास आणि ती व्यक्ती ओळखीचे असल्यास तिच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता तिला दर्शन देण्यात येत आहे त्यामुळे याठिकाणी सुरू असलेला हा प्रकार लवकरात लवकर थांबवावा याकरिता आस जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
यल्लमा डोंगरावर येणारे नागरिक हे मध्यम कुटुंबातील आणि गोरगरीब कुटुंबातील आहेत त्यामुळे त्यांचे जीवन समस्यांच्या विळख्यातून जात असते. त्यातच यल्लमा डोंगरावर प्रत्येक ठिकाणी पैसे आकारले जात असल्याने हा भाविकांना लुटणारा प्रकार शासनाने वेळीच थांबवा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *