मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी दिल्ली असल्याचं सत्ता स्थापनेच्या वेळी लक्षात आलंच. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बर्याचदा दिल्ली दौरा केला. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहे.
एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्ली दौर्यावर जाण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी फडणवीस नागपूरला आणि त्यानंतर रात्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta