नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधानांची मालिका केल्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी यासंदर्भातील इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले असतानाच आपण त्यांच्याकडे पदाचा राजीनामा देण्याबाबतची इच्छा व्यक्त केली होती, असेही राज्यपाल कोशारी यांनी बोलून दाखवले आहे.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपाल कोशारी यांना पदावरून हटवा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने सातत्याने केली जात होती. दरम्यान राज्यपाल कोशारी यांनी राष्ट्रपतीं ऐवजी पंतप्रधानांकडे आपला राजीनामा का पाठवला? याबाबतची आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta